पुढील 2 दिवस Vidarbha, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज; Kolhapur, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता

विदर्भातील अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात ४०.९ इतक्या तापमानाची नोंद झाली असून, अकोला, अमरावती, वर्धा येथे उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना भागांत आज उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे.या भागांना हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि घाट भाग, सिंधुदुर्ग भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ