Heat Wave| कोल्हापुरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो Alert, कमाल तापमान उसळणार?

पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढले असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा जबर तडाखा जाणवतोय.कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांना रविवारी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलाय.कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी 40 अंश पर्यंत पोहोचलेलं तापमान सध्या 37.1 अंश इतकं आहे.यलो अलर्टमूळे कमाल तापमान पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. तर विजांसह वादळी वाऱ्याचा इशाराही देण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ