रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे.. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली आहे. इशारा पातळी 5 मीटर असून, सध्या जगबुडी नदीची पाणी पातळी 5.20 मीटर आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.