गेल्या अनेक दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर अखेर उत्तर रत्नागिरीत आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह सुमारे १५ ते २० मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं; मात्र उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. उत्तर रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली असताना दक्षिण रत्नागिरी मात्र कोरडीच राहिली. अचानक झालेल्या या पावसाने दिलासा मिळाला असला तरी भातशेती व पाणीटंचाईचं संकट टाळण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवेवर परिणाम. मुंबईत पुढील 2 तासांची यलो अलर्ट जारी. अनेक विमानांना उड्डाण आणि लँडिंगसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती.