रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे.. संगमेश्वर तालुक्यात 24 तासांत तब्बल 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कसबा, शास्त्री पुल भागाला पावसाने जोरदार झोडपलं आहे. त्यामुळे शास्री नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. पावसाचा जोर असाच राहीला तर पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.