मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.