जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलानी मार्केट, टॉवर चौक आणि नवी पेठ परिसरात गेल्या दहा ते बारा तासापासून वीज पुरवठा हा खंडित झाला असून यामुळे नागरिकांसह व्यावसायिक व दुकानदार हैरान झाले आहेत. सकाळपासूनच वीज पुरवठा खंडित असल्याने इलेक्ट्रिक व्यवसायिकांसह अनेक लहान व्यवसायिकांनाही याचा मोठा फटका बसला असून यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..