राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय.. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात खासदार आणि कार्यकर्त्यांनी जंतरमंतरकडे कूच केली. सर्व खासदार बसमधून जंतरमंतरच्या दिशेने रवाना झाले. मात्र तिथे पोहोचण्याआधीच अशोका रोडवर हा ताफा अडवण्यात आला. यावेळी राहुल आणि प्रियंका यांनी अडवलेल्या जागेवरच ठिय्या दिला. दिल्ली पोलिसांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक जंतरमंतरवर जाण्यासाठी ठाम होते. अखेर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं..