दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचं आक्रमक आंदोलन सुरू आहे.ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने एल्गार पुकारलाय. गेल्या 9 तासांपासून राहुल गांधी आकाशवाणी भवनाबाहेर बसलेत.300 खासदारांना सोबत भेटीसाठी घेऊन जाण्यावर राहुल गांधी ठाम आहेत.भेटीच्या वेळेबाबत स्पष्टता दिल्यास राहुल गांधी आजच आंदोलन संपवण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.काँग्रेसन मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी अधिकृतपणे पत्र लिहण्यात आलंय.पोलिसांचे एक वरिष्ठ अधिकारी प्रियंका गांधी यांच्याशी सतत संपर्कात असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.