ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला गुरुवारी एक महिना पूर्ण होईल. मात्र अद्याप हत्येमागचं मुख्य कारण समोर आलेलं नाहीय, पोलीस तपासाबाबत योग्य उत्तर देतं नसल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी केलाय. यावरून ठाण्यात आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीला अट करावी या मागणीसाठी पूर्णकर कुटुंबासह समर्थकांनी कालपासून ठिय्या दिला.. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीची माहिती दिली. कायदा कोणीही हातात घेऊ नये अस आवाहन पोलिसांनी दिलंय. पूर्णेकर समर्थकांनी रात्रभर ठिय्या दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नौपाडा पोलिसांसोबत चर्चा केली.
High-voltage drama in Thane; even after 29 days, we are yet to get justice - Ram Purnekar | NDTV