हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचा फटका आत्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात ऊस पिकांची लागवड केली मात्र पाण्याअभावी शेकडो एकर शेतातील ऊस करपून गेलेय. वर्षभर कष्ट करून जोपासलेले पीक पाण्यावाचून डोळ्यादेखत करपून जात असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेलं पीक करपून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं. सणासुदीच्या काळात आनंद ऐवजी चिंतेचे सावट शेतकऱ्यांच्या वाटेला आला आहे.