Hingoli Drought| मराठवाडा-विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदीचे वाळवंट, 1972 नंतर पहिल्यांदाच भीषण दुष्काळ

हिंगोली जिल्ह्यात हिवाळ्याच्या सुरुवातीलाच नद्यांची पात्र कोरडी पडल्याचे चित्र दिसत आहे... ही ड्रोन दृश्ये आहेत मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीची...दरवर्षी या नदीच्या प्रवाहाने काठच्या गावांची शेती पिकायची, अनेक गावांची तहान भागायची, तीच पैनगंगा आज कोरडी ठाक पडली आहे...१९७२ च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच नदीचे वाळवंट झाल्याचे स्थानिक सांगत आहेत... पावसाने ओढ दिल्याने भूजल पातळी खालावली असून मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे... आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे...

संबंधित व्हिडीओ