हिंगोली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय.वादळी वाऱ्यामुळे सेनगावमधील अनेक विद्युत खांब कोसळून पडलेत.त्यामुळे सध्या सेनगावमधील अनेक गावं अंधारात आहेत. जवळपास 15 ते 20 गावांचा वीजपुरवठा ठप्प आहे.रात्रभर गावांचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्यानं नागरिक त्रस्त झालेत.तर दुसरीकडे विद्युत खांब पडल्यानं महावितरणचंही मोठं नुकसान झालंय..