हिंगोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येथील लढत अधिक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आता महायुतीत प्रवेश केल्याने ही स्थिती आहे. विशेषतः फाळेगाव सर्कलमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी एकाच जागेवर दावा ठोकल्याने महायुतीतल्या वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.