ज्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं ती भेट चीनच्या शेनझेन शहरात गुरुवारी पार पडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शेन्झेन शहरात एक ऐतिहासिक बैठक पार पडली. या बैठकीत अण्वस्त्र, अमेरिका-इराण संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्वप्रथम अणुशस्त्रांच्या धोक्यांवर चर्चा झाली. शी जिनपिंग यांनी अणुशस्त्रांना मानवतेवरील टांगती तलवार म्हटले आणि ती पूर्णपणे नष्ट केली पाहिजेत असंही सांगितलंय. साधारणपणे ४२ मिनिटं ही चर्चा झाल्याचं कळतंय.