धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार या तरुणाची हत्या करण्यात आली होती... त्याप्रकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडण्यात आलीय.. शिवसेना नेते रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी मांडली... सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी चाकू आणि शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई होईल का, असा सवाल त्यांनी विचारला.. त्यावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलंय.. लोकल ट्रेनमधल्या संशयित प्रवाशांच्या बॅग तपासण्यासाठी गृह विभागाची भरारी पथकं स्थापन करण्यात आलीय...त्याचबरोबर पूर्व कल्पना न देता करणार फलाट आणि रेल्वे डब्यात तपासणी करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिलीय..