केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आज अमित शहांचे पुण्यामध्ये तीन कार्यक्रम आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या सगळ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीये.