हनी ट्रॅपची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय.प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झालाय.लोढावर अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोस्को, बलात्काराचा गुन्हाही दाखल झालाय.62 वर्षीय लोढावर एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.तसंच मुलींचे अश्लिल छायाचित्र काढल्याचाही आरोप आहे. एवढेच नाही तर मुलींना लोढा हाऊस या ठिकाणी डांबून ठेवून धमकवल्याचा आरोपही करण्यात आलाय. नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे लोढा चर्चेत होता. 2024 मध्ये लोढाला 'वंचित'कडून उमेदवारी मिळाली होती.मात्र 5 दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली होती.