Mumbai-Goa महामार्गावर लांजाजवळ भीषण अपघात; अपघातात नववधूसह चौघांचा जागीच मृत्यू

गोवा ट्रिपवरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला भरधाव वेगात असलेली कार धडकली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. या कारमधून अनस आणि फिजा हे नव्याने लग्न झालेलं जोडपं होतं. अनस अपघातात जखमी झाला असून फिजाचा मृत्यू झाला आहे. 20 दिवसांपूर्वी या दोघांचा निकाह झाला होता. या अपघातात अनसची आई, त्याचा चुलत भाऊ यांचाही मृत्यू झाला आहे. कारच्या चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे कुटुंब मुंबई सेंट्रल इथं राहणारं होतं आणि घरी परतत होतं.

संबंधित व्हिडीओ