संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातील सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तेही पहाटे. दोघेही खेडगावामध्ये लपून बसले होते मात्र या प्रकरणातून सुटका होणार नाही हे लक्षात येताच दोघेही पोलिसांच्या स्वाधीन झालेत. तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सात दिवस सासरा आणि दीर हे फरार होते.