मीच गोपीनाथ मुंडेंची खरी वारस आहे असा इशारा पंकजा मुंडेंनी दिलाय.. वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडेंचा आत्मा आहे, तो माझा आत्मा आहे कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे असं पंकजा मुंडेंनी ठणकावून सांगितलंय.. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या कारखान्यावरून आणि त्यांच्या राजकीय वारशावरून पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असल्याचं विधान छगन भुजबळांनी केलं होतं.. त्यालाच आता पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय..