कुर्ल्यात आज झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू झालाय... कुर्ला परिसरामध्ये झाड कोसळून युनूस शेख यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झालेला आहे का अशा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला जातोय.. दरम्यान झाड कोसळल्याची ही दुसरी घटना असून...चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं.. आता पुन्हा ही घटना घडल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना पुन्हा घेरण्याची शक्यता आहे.