सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभरापासून सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्यानं जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. भारतीय हवामान खात्यानं पुढील तीन तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला तरी नागरिकांनी सतर्क रहावं आणि स्थानिक शासकीय यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं अशा सूचना देण्यात आल्यात.