Maharashtra Drought | कोरड्या दुष्काळाची झळ, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत | NDTV Marathi
Impact of dry drought: Milk-producing farmers in distress.
बीड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली आहेत… त्यातच आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे… आणि याचा थेट फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. आहेर धानोरा गावातील गणेश बनसोडे यांच्याकडे लहान-मोठी अशी तब्बल 40 जनावरं आहेत. मात्र चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे त्यांच्यासमोर जनावरं जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 12 ते 13 लिटर दूध देणारी म्हैस आता अवघं 6 ते 7 लिटर दूध देतेय. उत्पादन निम्म्यावर आल्याने खर्च भागवणंही कठीण झालंय