आणि आता बातमी आहे NDTV मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची...लातूरमधील ममदापूर गावातील बोयने कुटुंबाचं कर्जाचे हफ्ते थकवल्यामुळे घर सील करण्यात आलं होतं....या कुटुंबाची व्यथा
एनडीटीव्ही मराठीने समोर आणल्यानंतर आता प्रशासन आणि बँक अधिकारी थेट गावात पोहोचले आहेत. बोयने कुटुंबाला पुन्हा स्वतःचं घर मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यावेळी गावातील परिस्थितीचा आढावा घेत बँक अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी....