हिंगोली विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं बघायला मिळतंय. महाविकास आघाडीकडनं ठाकरे गटाला ही जागा सुटल्यानं नाराज असलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.