अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त नाट्य रंगलं ते नागपुरात आम्हाला हाच उमेदवार हवा,उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले की त्या उमेदवारानं अर्ज मागे घ्यायला जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना घरातच कोंडलं.कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या घरातच कोंडू ठेवलं. मला अर्ज मागे घ्यायला जाऊ द्या, अशी विनंती गावंडे खिडकीतून करत होते.मात्र काही केल्या कार्यकर्ते कुलूप उघडायला तयार नव्हते.पाहुया पुढे काय घडलं.