हातावर पोट भरणाऱ्या एक मजुराला आयकर विभागाकडून एक नाही दोन नाही तर तब्बल 314 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आलीय.मूळच्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर कोहाड हे काही दिवसांपासून नागपूरमध्ये मजुरी करतात.अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत असताना इतक्या मोठ्या रकमेची आयकर नोटीस मिळाल्यामुळे कोहाड यांची चिंता वाढलीय.त्यातच त्यांची प्रकृती खालावलीये.. त्यामुळं त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोहाड यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आयकर विभागाचा दावा आहे.314 कोटी रुपये हे फक्त थकित आयकराचे असल्याचे सांगण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती चंद्रशेखर कोहाड यांनी केलीय.