Dombivli मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी परिसरात चोरी आणि नशेखोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वारंवार होणाऱ्या घरफोड्यांमुळे काही नागरिकांनी परिसर सोडल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, भाजप कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांच्या घरात चोरट्यांनी धाड टाकून दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित व्हिडीओ