टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने येणार आहेत. वानखेडे स्टेडियमध्ये दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचे मोठे आव्हान असणार आहे. परस्परांच्या खेळाची चांगली जाण असलेल्या दोन्ही संघांमध्ये श्रेष्ठत्वाची चुरस अनुभवायला मिळणार आहे....प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या भारताला बलाढ्य संघांविरुद्ध अपेक्षित दमदार कामगिरी करता आलेली नाही....भारत-इंग्लंड यांनी प्रत्येकी दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. उपांत्य फेरीतील त्यांची लढतही आतापर्यंत समसमान राहिली...प्रत्येकी एक विजय. विशेष म्हणजे, दोन्ही वेळा उपांत्य फेरी जिंकणाऱ्या संघाने अंतिम फेरीतही विजेतेपद पटकावले आहे. टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद सलग राखणारा पहिला संघ आणि यजमान देश म्हणून विजेतेपद पटकावणारा पहिला संघ होण्याची भारताकडे संधी असेल.