विरोधी पक्षांकडून आता सर्वपक्षीय बैठकीची मागणी करण्यात आली.तात्काळ सर्वपक्षीयांची बैठक घ्यावी, मोदींनी हजर रहावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली.'पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली?.. असा सवालही राऊतांनी केलाय. तर आमची सर्वपक्षीय बैठकीची मागणी असून पंतप्रधानांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे.असं काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.