बेकायदेशीरपणे बांगलादेशमध्ये गेलेल्या एका भारतीयाला सीमा ओलांडताना बीएसएफ ने गोळ्या घातल्यात. या गोळीबारामध्ये संबंधित व्यक्ति गंभीर जखमी झालाय. त्रिपुरा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अख्तर जमाल रोनी असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. तो पुत या गावातला रहिवासी आहे. बांगलादेशातील एका धार्मिक कार्यक्रमात तो सहभागी होण्यासाठी एक दिवस आधी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडत होता. आणि घरी परतत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.