IndiGo Flight Status | इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली, प्रवाशांचा संताप | LIVE Updates NDTV

विमानसेवेत देशातील सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडिगो’ची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे 1300 उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक उड्डाणांना विलंब झाल्यानं हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. हा गोंधळ पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत....दिल्लीमध्ये ९५, मुंबईत ८५, हैदराबाद ७० आणि बंगळुरूमध्ये ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. देशातील इतर विमानतळांवरही हीच स्थिती होती... गेल्या दोन दिवसांतच नव्हे तर नोव्हेंबर महिन्यात इंडिगो कंपनीची एकूण १,२३२ विमाने रद्द झाली. या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

संबंधित व्हिडीओ