इंडिगो विमान कंपनीला पायलटांच्या कमतरतेचा सामना करावा लागत असल्यामुळे, नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दोन दिवसांत दहा पेक्षाही जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. हज यात्रेससाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मुंबईला पोहोचण्यासाठी उड्डाण उपलब्ध न झाल्याने, त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुंबई गाठावी लागली आहे.