Navi Mumbai तून उड्डाणासाठी Indigo सज्ज, इंडिगोची 12 आंतरराष्ट्रीय उड्डाणं नवी मुंबईतून | NDTV मराठी

नवी मुंबई विमानतळावरुन फेब्रुवारी 2027 पासून इंडिगोची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होईल. त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरुन टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवांचा विस्तार केला जाणार आहे. सध्याच्या मुंबई विमानतळावरुन होणारी इंडिगोची ही 12 आंतरराष्ट्रीय उड्डाणं फेब्रुवारी 2027 नवी मुंबई विमानतळावरुन होतील. यात बाहरीन, रियाध, दम्माम, जेद्दाह, मदिना, कुवेत, रास अल खैमाह, फुजैराह, मस्कत, ढाका आणि जकार्ता या विमानसेवांचा समावेश असेल. याशिवाय, काठमांडूसाठी दररोज एक अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात येईल. या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होईल. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी अधिक विस्तारतील. या आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आवशक्य असलेली देशांतर्गत कनेक्टिव्हिटी इंडिगो उपलब्ध करुन देईल. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आवश्यक देशांतर्गत विमानसेवाही इंडिगो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करेल. या ऐतिहासिक टप्प्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन्ही विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय, चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ