Indonesia Heavy Rain | इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 80 हून अधिक बेपत्ता | NDTV मराठी

इंडोनेशियामधील जावा बेटांवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. पाणी आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे येत असून, येथे मदतीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जावा बेटांवर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम जावा प्रांतामधील वेस्ट बांडूंग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडाला आहे. डोंगराळ प्रदेशातून चिखल, दगड आणि झाडे वाहून आली आहेत. त्याखाली ३४ घरे दबली आहेत.

संबंधित व्हिडीओ