सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून तो जनतेसाठी समर्पित करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.