इंदुरीकर महाराजांनी मीरा-भाईंदर येथील एका कीर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय. “मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या पैशावर प्रेम करतात असं इंदिरीकर महाराजांचं म्हणणं आहे.,., इंदुरीकर महाराजांनी सांगितलेल्या या प्रेमाच्या व्याख्येमुळं त्यांचा प्रेमा भावनेशी काही संबंध तरी आहे का असा प्रश्न विचारला जातोय. मुलींसंदर्भात असं वक्तव्य करण्याची इंदुरीकर महाराजांची ही पहिलीच वेळ नाहीय. या पूर्वीही मुलींचं टिकली लावणं, लग्न यासगळ्यावरून महाराजांनी केलेली वक्तव्य चर्चेत होती. त्यामुळे मुलींच्या चारित्र्यावरून बोलण्य़ापेक्षा स्त्री शक्तीवर बोला असा सल्ला अनेक जण त्यांना सोशल मिडीयावरून देताय.