नीट पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्याची सूचना इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी केली आहे. एकच प्रश्नपत्रिका तयार करून ठेवण्याऐवजी प्रश्नसंचातून परीक्षेच्या दिवशी शेवटच्या क्षणी प्रश्नपत्रिका तयार करावी, असा त्यांचा प्रस्ताव आहे. यामुळे प्रश्नपत्रिका आधीच मिळवून तिची विक्री करण्याचे प्रलोभन कमी होऊ शकते. तसेच, देशभरात ऑनलाइन परीक्षांचा विस्तार करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या मुद्द्यांचा परीक्षा सुधारणांसाठी स्थापन केलेल्या समितीत विचार केला जाणार आहे. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं जुलै २०२६ मध्ये नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
Prepare question papers on the day of the exam itself to prevent paper leaks: Infosys co-founder Nandan Nilekani's advice.