वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होतायेत. आणि अशातच आता वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जालिंदर सुपेकरांच्या पत्नीने तयार केला होता आणि त्यासाठी कसपटे कुटुंबियांकडनं त्यांनी एक लाख पन्नास हजार स्वीकारल्याचं समोर आलंय. लग्नात एक लाख पन्नास हजारांचा रुखवत दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी अंजली दमानियांना दिली आहे.