Iran-Israel War|PM Modi यांच्या अध्यक्षतेखाली CCS बैठक; प.आशियातील संकट,भारतीयांच्या सुरक्षेवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवरील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीसोबत बैठक घेतली.या बैठकीत पश्चिम आशियातील ताज्या संघर्षामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर मोदी रात्री ९.३० वाजता राष्ट्रीय राजधानीत पोहोचल्यानंतर लगेचच सीसीएसची बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह समिती सदस्यांनी उपस्थित असलेल्या या बैठकीत पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थिती आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित व्हिडीओ