इराण- इजराइल युद्धच्या पार्श्वभूमीवर दुबईत सांगलीच्या कुपवाड येथील 30 पर्यटक अडकले आहेत. पर्यटनासाठी 30 जणांचा ग्रुप हा दुबईमध्ये गेला होता, मात्र इराण इजराइल युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्याने सर्व पर्यटक आता दुबईमध्येच अडकले असून ते सर्वजण सध्या सुखरूप आहेत.एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून कुपवाड येथील हे सर्व पर्यटक दुबईमध्ये फिरण्यासाठी गेले होते... युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते दुबईतच अडकले आहेत. हॉटेलच्या परिसरातील काही अंतरावर स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याने भारत सरकारने आमची सुटका करावी,अशी मागणी या सर्व पर्यटकांकडून आता करण्यात येत आहे.