Iran-Israel War| युद्ध लांबल्यास जगाला खतटंचाईचा धोका, युद्धाचा फटका बसणार भारताच्या बळीराजाला

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध लांबल्यास तेलटंचाईसोबतच खतांचीही टंचाई होण्याची शक्यता आहे.. खतांची मोठी वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. खतांच्या जागतिक व्यापारामधली 33 टक्के वाहतूक इथून होते. त्यामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं भारतासह विविध देशांना त्याचा फटका बसेल असा इशारा अभ्यासकांनी दिलाय. मान्सूनआधी देशात खतांची आवक तसंच पुरवठा होणं आवश्यक असतं. मात्र ही साखळी विस्कळीत झाल्यास पेरणीचा निर्णय लांबणीवर टाकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही. धान्य उत्पादनात घट झाल्यास अन्नधान्याच्या किंमतीही गगनाला भिडतील अशी भीती व्यक्त केली जातेय.

संबंधित व्हिडीओ