इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये तो चित्रपटसृष्टीत एकटे पडल्याबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो खूपच तणावात दिसत असून रडतानाही दिसत आहे. तो या व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, “बॉलिवूड खूप वाईट आहे, बॉलीवूड खूप असभ्य आहे.”क्लिपमध्ये बाबिलने शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग यांची देखील नावे घेतली आहेत. दरम्यान बाबिल खानच्या कुटुंबाने जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की,“बाबिल खानच्या या व्हिडिओच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी, मीडिया आणि चाहत्यांनी बाबिल खानचे शब्द त्यांच्या संपूर्ण संदर्भात समजून घ्यावेत” असं आवाहन केलं आहे.