Mahavikas Aghadi संपली? काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, मविआ सोडणार? NDTV मराठी

राष्ट्रवादीमधील संभाव्य विलिनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर उमटत आहे....यासंदर्भात काँग्रेस अधिकृत निर्णय घेणार आहे....राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतूनही बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले....त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणाला धक्का बसण्याची शक्यता आहे....राज्यातील काँग्रेसचे नेते याबाबत लवकरच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार असल्याचेही माहिती मिळतेय...काँग्रेसने महापालिका निवडणुकीत मुंबईत उद्धव सेनेबरोबर युती करण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणूक लढवली होती....वैचारिक भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काँग्रेसमध्ये स्वबळावर जाण्याचा सूर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये उमटत आहे.....

संबंधित व्हिडीओ