इराण-इस्रायल युद्धाचा फटका अन्य देशांनाही बसतोय.युद्धाच्या परिस्थितीमुळे दुबईसाठी जाणारी उड्डाण रद्द करण्यात आलीयत.मुंबई, दिल्ली,हैदराबाद,चंदीगढ,धर्मशाला विमानतळावरुन दुबईला जाणारी उड्डाण रद्द करण्यात आलीय. प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय.संबंधित विमान कंपन्यांनी या बदलाबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना दिली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना तिकीट परतावा किंवा युध्दजन्य स्थिती संपल्यानंतरच्या पुढील तारखांचे पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जात आहेत.