शिर्डीतून साईबाबांच्या शिर्डीमध्ये महापरिक्रमेचा जागर पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी तेरा फेब्रुवारीला खंडोबा मंदिरातून चौदा किलोमीटर ची परिक्रमा सुरु होते. यंदा देखील पहाटेपासूनच भाविकांचा मेळा शिर्डीमध्ये परिक्रमेमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. साईंच्या रथाची महाआरती होऊन परिक्रमेला प्रस्थान झालं. लाखभर भाविक या परिक्रमेमध्ये पायी निघाली.