जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना जागावाटपाच्या मुद्यावर महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या अंतिम टप्प्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.महायुतीच्या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री सतीश पाटील यांची उपस्थिती आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असल्याने रखडलेल्या जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठकीत चर्चा सुरू आहे.