जळगावात शेतकऱ्याने जीवन संपवलं, Eknath Khadse यांनी कुटुंबाची भेट घेत केलं सांत्वन | NDTV Marathi

जळगावात शेतकऱ्याने जीवन संपवलं, Eknath Khadse यांनी कुटुंबाची भेट घेत केलं सांत्वन | NDTV Marathi Jalgaon farmer ends his life; Eknath Khadse visits the family and offers condolences. बोदवड तालुक्यातील येवती येथे कर्जबाजारीपणा आणि दुष्काळजन्य परिस्थितीच्या विवंचनेतून 48 वर्षीय शेतकरी काशिनाथ मारुती बावस्कर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 20 सप्टेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केलं होतं. या घटनेनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी बावस्कर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील बोदवडमध्ये येऊनही या कुटुंबाची भेट न घेतल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, पंचनाम्यांचा फार्स न करता जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ