Jalgaon Fire| भुसावळ शहरातील पापा नगर परिसरात दोन ते तीन घरांना आग, अग्निशमन दलाचे बंब दाखल

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पापा नगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आलीय... एका घराला ही आग लागल्याने अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केलं.. आजूबाजूच्या इतर दोन घरांनाही आग लागल्याची माहिती मिळतीय.. सुदैवाने घरातील सदस्य हे बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.. घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत..

संबंधित व्हिडीओ